Uddhav Thackeray responds to Devendra Fadnavis Rudali comment during Marathi language victory rally : मराठी भाषा विजय मेळाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे रुदाली असल्याची त्यांनी म्हटलं होतं. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठी माणसाचा आनंद जर त्यांना रुदाली वाटत असेल तर हिणकस प्रवृत्ती आहे, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांच्या टीकेवर भाष्य केलं.