
मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणूस एकत्र येत होता. पण मराठी माणसाची एकजूट होऊ नये, अशीच या सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच हिंदीबाबतचा शासन निर्णय रद्द केला. पण पाच जुलैला जल्लोषाचा मोर्चा किंवा सभा होईल. या आंदोलनात जे सहभागी होते त्या सर्वांशी चर्चा करून येत्या एकदोन दिवसात याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयानंतर स्पष्ट केले.