Uddhav Thackeray : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वीच उद्धव ठाकरेंचा PM मोदींना इशारा; म्हणाले...

मराठवाडा साहित्य संमेलनात बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदींच्या दौऱ्यावर भाष्य केलंय.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांना काही सवाल केले आहेत तसेच सल्लाही दिला आहे.

मोदींनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राला काय दिलासा देणार ते आधी सांगाव त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या महामार्गाचं उद्घाटनं करावं, असं म्हटलं आहे. (Uddhav Thackeray Speaks on PM Modi at Marathwada Sahitya Sammelan)

Uddhav Thackeray
Government Scholarship : यापुढं अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार नाही 'ही' स्कॉलरशिप; मोदी सरकारचा आणखी एक निर्णय

मराठवाडा साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधानांनी उद्या जरुर यावं त्यांनी आमचे कानही टोचावेत तो त्यांचा अधिकार आहे. पण कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आणि यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जी अरेरावी सुरु आहे. त्यावरही तुम्ही सणकून बोललचं पाहिजे. महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्नावरील भूमिकेची महाराष्ट्र वाट पाहतो आहे.

Uddhav Thackeray
FD Rates : 'ही' बँक देतेय FD वर सर्वाधिक व्याज; वाचा काय आहे स्कीम?

समृद्धी महामार्ग होणार तो झालाच पाहिजे. माझी राजधानी आणि उपराजधानी जवळ आणणारा तो महामार्ग आहे. त्याचं काम आमच्या काळात आम्ही अधिक वेगानं केलं आहे. ते रस्ते होतील आणि ते केलेच पाहिजेत.

पण एका मोठ्या रस्त्याचं उद्घाटन करत असताना कर्नाटकनं महाराष्ट्राचे रस्ते बंद केले असतील तर पंतप्रधान म्हणून त्यांना काय बोलणार आहात आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार असाल ते आधी सांगा. मग शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या त्या महामार्गाचं उद्घाटन करा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना सुनावलं आहे.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

सीमाप्रश्नासाठी स्वतः शिवसेनाप्रमुख तीन महिने तुरुंगात राहिले होते. शिवसेनेची स्पष्ट भूमिका बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालीच पाहिजे हीच होती. पण आज बाळासाहेबांची शिवसेना म्हणून तुमच्या ढेंगेखाली जाऊन आलेली लोकं आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका काय आहे हे सुद्धा आज स्पष्ट झालं पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी उद्धव ठाकरेंनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com