esakal | जेटलींच्या निधनाने शिवसेनेची वैयक्तिक हानी : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

जेटली यांचे व्यक्तिमत्व असामान्य होते. राजकीय जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहून ही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले. ते निष्णात वकील व  धुरंधर नेते होते.

जेटलींच्या निधनाने शिवसेनेची वैयक्तिक हानी : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : "अरुण जेटली यांचा मृत्यू हा देशाला धक्का आहेच पण शिवसेनेची वैयक्तिक हानी आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा महत्वाचा खांब कोसळला आहे." या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

"जेटली यांचे व्यक्तिमत्व असामान्य होते. राजकीय जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहून ही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले. ते निष्णात वकील व  धुरंधर नेते होते. 'संकटमोचक' म्हणून जेटली यांनी मोदी सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजप मध्ये नाते टिकावे असे मानणाऱ्यांपैकी जेटली होते.

जेटली यांनी राजकारणात राहून नाती व माणसे जपली", असे सांगून उद्धव पुढे म्हणाले की "राष्ट्रीय राजकारणातून जेटली यांचे जाणे हे राजकारणातून 'साहसी' व्यक्तीचे जाणे आहे.आम्ही स्वता अरुण जेटली यांचे चाहते होतो. त्यांच्या जाण्याने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे!"

loading image
go to top