'अध्यक्ष आले, 'पक्षाध्यक्ष' येतील असे वाटत नाही', उद्धव ठाकरेंचा 'मोठ्या साहेबांना' चिमटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

पवारांना याबाबत केले होते सुतोवाच : अहिर
शरद पवार यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली होती. निर्णयाबाबत मी त्यांना कल्पना दिली नव्हती, पण सुतोवाच केले होते. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली होती आणि ते साकारत्मक होते, असे अहिर यांनी सांगितले.

मुंबई : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी  मी अद्याप घडाळ्याचे दोन्ही काटे तसेच ठेवले आहेत, फक्त चावी मारण्याचे काम करत आहेत, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.  

सचिन अहिर यांनी आज (गुरुवार) हातातील राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेचे शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर भायखळ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

अहिर यांच्या प्रवेशानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की मला मनाने जिंकलेली माणसे हवी आहेत. मला फोडलेली माणसे नकोत. नवनवीन माणसे पक्षात येत असताना त्यांना काय जबाबदारी देण्यात येईल, याचा विचार केलेला असतो. शिवसेनेची ताकद वाढत आहे. मराठी माणसाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही, याची खात्री मी देतो. पक्ष वाढविणे यासाठी एकत्र येऊन काम करू. अजून निवडणूकीला वेळ आहे. त्यापूर्वीच चांगली चांगली लोक पक्षात येत आहेत. 

पवारांना याबाबत केले होते सुतोवाच : अहिर
शरद पवार यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली होती. निर्णयाबाबत मी त्यांना कल्पना दिली नव्हती, पण सुतोवाच केले होते. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली होती आणि ते साकारत्मक होते, असे अहिर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray statement on NCP leader Sachin Ahir enters shivsena