esakal | आज मला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे; काय म्हणताहेत उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray

‘परीक्षांच्या बाबतीत निर्णय व्हावा’
अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुणनिश्‍चिती करण्याचा फॉर्म्युला तयार करण्याचे ठरविले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशारीतीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधीदेखील असेल, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राने व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत एकसमान निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आज मला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे; काय म्हणताहेत उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - ‘आपण इतके दिवस लॉकडाउनविषयी बोललो. पण, आज मला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे. महाराष्ट्राने ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये कशी झेप घेतली आहे, ते सांगायचे आहे,’ असे ठामपणे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याने उचललेल्या पावलांविषयी प्रभावी सादरीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी काही औषधांच्या उपचारपद्धतीस त्वरित मान्यता मिळावी, तसेच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत, परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे, अशा काही मागण्याही केल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या दोन-अडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असतांना आम्ही मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या प्रारंभी पंतप्रधानांनी लडाख येथे धुमश्‍चक्रीच्या घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सीमेबाहेरील संकटाचाही पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली समर्थपणे मुकाबला करू, असा विश्वास व्यक्त केला.

दिलासादायक बातमी! राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..

वैश्विक महामारी कोरोनाचे संकट सुरू असतांना देखील आम्ही नुकतेच १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार १२ मोठ्या कंपन्यांसमवेत केले. यामुळे १४ हजार नागरिकांना रोजगारही मिळणार आहे. या उद्योगांत चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत राज्यभर सुमारे ३ लाख बेडची सुविधा निर्माण केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

loading image