दिलासादायक बातमी! राज्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी..

patients discharge
patients discharge

मुंबई : राज्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांंपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक आहेत. राज्यात आतापार्यंत 57 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले असून साधारणता 50 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल 50.99 टक्के एवढा झाला आहे. राज्यात 16 जून रोजी 1802 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 57 हजार 851 झाली आहे. दरम्यान, याच दिवशी कोरोनाच्या 2701 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 50 हजार 44 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 राज्यात सध्या 55 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 97 प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 84 हजार 268  नमुन्यांपैकी  1 लाख 13 हजार  445  नमुने पॉझिटिव्ह (16.57 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख  86 हजार  868 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1543 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  80 हजार 502 खाटा उपलब्ध असून सध्या 27 हजार 242 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. याशिवाय काल मुंबईतील 862 आणि उर्वरित राज्यातील 466 अशा एकूण 1328 जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण झाले बरे: 

मुंबई महानगरपालिका -- 3141

ठाणे -- 8363, पालघर -- 797 , रायगड -- 1307

रत्नागिरी -- 300, सिंधुदुर्ग -- 91  

पुणे -- 7293, सातारा -- 473, सांगली -- 144

कोल्हापूर -- 532 , सोलापूर -- 692, नाशिक -- 1218

अहमदनगर -- 179, जळगाव -- 798, नंदूरबार -- 33, धुळे -- 254

औरंगाबाद -- 1573, जालना -- 181, बीड -- 51

लातूर -- 121, परभणी -- 71, हिंगोली -- 195, नांदेड -- 161, उस्मानाबाद -- 113

अमरावती -- 259, अकोला -- 569, वाशिम-- 8

बुलडाणा -- 77, यवतमाळ -- 139,  भंडारा -- 41

नागपूर -- 631, वर्धा --  8, गोंदिया -- 69 

चंद्रपूर -- 28, गडचिरोली -- 41 

एकूण: बाधीत रुग्ण -- 1,13,445

बरे झालेले रुग्ण -- 57,851

मृत्यू -- 5537

इतर कारणांमुळे झालेले मृत्यू --13

ॲक्टीव्ह रुग्ण -- 50,004

state has more number of discharged patients than patients on treatment  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com