

uddhav thackeray
esakal
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. "त्यांची काय क्षमता आहे आणि काय पात्रता आहे?" असा थेट सवाल करत त्यांनी चव्हाणांना लक्ष्य केले. साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.