होळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सत्तासंंघर्षावर सुनावणी; आजची सुनावणी केवळ २ तासांत उरकली : Thackeray vs Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thackeray vs Shinde

Thackeray vs Shinde: होळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सत्तासंंघर्षावर सुनावणी; आजची सुनावणी केवळ २ तासांत उरकली

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारी म्हणजेच २ मार्चला संपवा असं सरन्यायाधीशांनी मागील सुनावणीत निर्वाळा दिला होता. मात्र, शिंदे गटाचे वकील हरीश साळवी यांच्या सरप्राईज एन्ट्रीमुळे सरन्यायाधीशांच्या निर्णयात मोठा बदल झाला आहे. आजची सुनावणी केवळ २ तासांच उरकली.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी आज संपणार नाही. हरीश साळवे यांचा युक्तिवाद आधीच्या वेळापत्रकात नव्हता. अचानक त्यांनी एन्ट्री केली. आज दोन तासातच कामकाज संपवले कारण आज दिवसभरामध्ये सुनावणी पूर्ण होऊ शकत नव्हती. होळीच्या सुट्टीनंतर आता १६ मार्चला पुन्हा सुनावणी होणार आहे.