उध्दव ठाकरे घेणार महाराष्ट्राचा आढावा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विस्तारासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जिल्ह्याजिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.

उध्दव ठाकरे घेणार महाराष्ट्राचा आढावा!

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विस्तारासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जिल्ह्याजिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. दिवाळी संपताच ३१ ऑक्टोबरपासून बैठकांना प्रारंभ करणार आहेत. या बैठकांना खासदार, आमदार, जिल्हासंघटक ,जिल्हाप्रमुख, महिला आघाडीप्रमुख, युवासेनाप्रमुख तसेच त्या त्या मतदारसंघातले पराभूत उमेदवारांनी हजर रहावे, असे सांगण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी परभणी, जालना, बुलढाणा, अकोला तर १ तारखेला संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बीड या जिल्ह्यांची बैठक होईल. २ नोव्हेंबर रोजी धाराशिव, यवतमाळ, लातूर अमरावतीविषयी चर्चा होईल.

नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांबाबत ३ तारखेला चर्चा होईल. या बैठकीनंतर ४ ते एकादशी तुळशी विवाहानिमित्त चार दिवस चर्चा बैठका होणार नाहीत. ७ नोव्हेंबर रोजी जळगाव, रावेर, पुणे, बारामती तर ८ नोव्हेंबर रोजी शिरुर, मावळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर ९ नोव्हेंबर रोजी पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे १० रोजी कोल्हापूर, हातकणंगले, अहमदनगर, शिर्डी, तर ११ नोव्हेंबर रोजी सांगली, माढा, सोलापूर, सातारा या ठिकाणांवर चर्चा होईल. १२ नोव्हेंबरला रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली, चंद्रपूरवर चर्चा होईल .

मुंबई महापालिका निवडणुकीमुळे ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाचा भाग झाला असून, १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी चर्चा होणार आहे. शिवसेनेसाठी या बैठका अत्यंत महत्वाच्या आहेत. सर्व पदाधिकार्यांनी या बैठकीला आपापल्या भागाचा अभ्यास करुन हजर रहावे असे कळवण्यात आले आहे.