अजित पवार 'टाकाऊ माल'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या 'मुतऱ्या' थोबाडाने बोलत असून ते टाकाऊ माल आहेत, अशा शब्दात घणाघाती टीका केली आहे.

अजित पवार यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या बुधवारी जालन्यात एका कार्यक्रमादरम्यान टीका केली होती. पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार असा सवाल अजित पवार यांनी केला होता. यानंतर 'सामना'च्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udhhav thackeray criticize ajit pawar on ram mandir issue at saamna editorial