मोठी बातमी : विद्यापीठं अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ शकतात, UGC ने दिली परवानगी; राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

विद्यार्थ्यांनो तात्काळ अभ्यासाला लागा. कारण आता विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात असा निर्णय UGC कडून घेण्यात आलाय.

मुंबई : विद्यार्थ्यांनो तात्काळ अभ्यासाला लागा. कारण आता विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात असा निर्णय UGC कडून घेण्यात आलाय. शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा रद्द कण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेला. तसं राज्य सरकारने घोषितही केलं होतं.  ATKT परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेऊ असं सरकारकडून वारंवार बोललं जात असताना केंद्राकडून विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय आलाय. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्राद्वारे विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. आरोग्य विभागाकडून घालून दिलेल्या नियमांप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात आलीये.  यानंतर  UGC ने विद्यापीठांना परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून विद्यापीठांना परीक्षा घेता येणार आहेत. 

BIG NEWS - पनवेलमध्ये 'लॉकडाऊन'च्या निर्बंधात पुन्हा 'बदल', असे असतील नवे नियम

महत्त्वाची बाब म्हणजे UGC च्या परिपत्रकात विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करू नये. शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेतल्याच पाहिजे असं नमूद केलंय. मात्र आता राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून आता यावर काय निर्णय घेतला जातोय हे पाहाणं महत्त्वाचं असणार आहे.

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणं योग्य नसल्याची महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची भूमिका आहे. मात्र भाजपकडून विना परीक्षा विद्यार्थ्यांना पास करू नये अशी भूमिका घेण्यात आली होती. विना परीक्षा विद्यार्थ्यांना पास केल्यास त्या विद्यार्थ्यांना कोविड बॅच म्हणून टॅग लागेल असं भाजपचं म्हणणं होतं. राज्य सरकारने परस्पर परीक्षा रद्द केल्याने राज्यपालांनी देखील नाराजी व्यक्त केलेली. अशात आता UGC ने परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. 

UGC gave permission to universities to conduct exams of last year


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UGC gave permission to universities to conduct exams of last year