Ulhasnagar Temple Dispute Violence
esakal
मंदिरात प्रवेशावरून झालेल्या वादानंतर महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी महिलेला अर्धनग्न करत चपलीचा हार घालण्यात आल्याचा आरोप आहे. उल्ल्हासनगरमधील विट्ठलवाडी परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी आता सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.