Umesh Kolhe Murder : सात आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umesh Kolhe Murder Case | Amravati News

Umesh Kolhe Murder : सात आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Umesh Kolhe Murder Case : अमरावती येथे केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सात आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एनआयएने आज उमेश कोल्हे हत्याकांडातील सात आरोपींना अमरावती येथील विशेष एनआयए न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली होती.

21 जून रोजी अमरावतीत झाली होती हत्या

उदयपूरच्या कन्हैयालाल याच्या हत्येनंतर 21 जून रोजी अमरावतीमध्ये 54 वर्षीय उमेश कोल्हे यांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली होती. कारण होते नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांच्याकडून करण्यात आलेली पोस्ट. उमेशचा मुलगा संकेत कोल्हे यांने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी 23 जून रोजी मुदस्सीर अहमद (22) आणि शाहरुख पठाण (25) या दोघांना अटक केली. दोघांची चौकशी केल्यानंतर हत्येत आणखी चार जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. उर्वरित आरोपी अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतिब रशीद (२२) आणि शमीम फिरोज अहमद यांनाही अटक करण्यात आली.

उमेश कोल्हे हे मेडिकल स्टोअर बंद करून जात असताना 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान ही घटना घडली. मुलगा संकेत त्याच्यासोबत दुसऱ्या स्कूटरवर होता. महिला महाविद्यालय न्यू हायस्कूलच्या गेटजवळ उमेश यांना अचानक दोन मोटारसायकलस्वारांनी अडवले. त्यानंतर हल्लेखोराने त्याच्या गळ्यावर डाव्या बाजूला चाकूने वार केले. आजूबाजूच्या काही लोकांच्या मदतीने उमेशला जवळच्या एक्सॉन रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर पोस्ट व्हायरल केल्याचे तपासादरम्यान पोलिसांना समोर आले होते. या हत्याकांडाशी संबंधित एका आरोपीने सांगितले की, कोल्हेने पैगंबरांचा अनादर करणाऱ्याला पाठिंबा दिला, त्यामुळे त्याला मरण पत्करावे लागले.

टॅग्स :Amaravati