
नाशिक : नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला राज्यभरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी विकास विभागांतर्गतच्या आश्रमशाळांमधील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागले आहे. गणवेश वितरणात झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली असून, गणवेश नेमके केव्हा मिळणार, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही.