
नाशिक : मुसळधार पावसात रस्त्यावर ठेवलेला भुईमूग वाहून जात असताना तो अडवण्यासाठी एका तरुण शेतकऱ्याची केविलवाणी धडपड सुरु असल्याचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. गौरव ऊर्फ इंदल पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याचा व्हिडिओ पाहून थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्याला फोन केला आणि विचारपूस केली. तसंच त्याच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचं आश्वासनही दिलं.