केंद्रीय मंत्री भागवत कराडांमुळे कॅमेरामनचा वाचला जीव, नेमकं काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwat Karad News

केंद्रीय मंत्री भागवत कराडांमुळे कॅमेरामनचा वाचला जीव, नेमकं काय घडलं?

औरंगाबाद : दिल्लीत गुरुवारी (ता.१६) एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रामाच्या ठिकाणी गेलेल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी बेशुध्द पडलेल्या कॅमेरामनला तात्काळ प्राथमिक उपचार करीत त्यांचा जीव वाचवला. तात्काळ उपचार मिळल्यामुळे या कॅमेरामनचा जीव वाचल्याचे डॉ.कराड यांनी सांगितले. कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे त्या कॅमेरामनला त्रास जाणवू लागला होता. (Union Minister For State Bhagwat Karad Save Cameraman Life)

हेही वाचा: लालची नेत्यांमुळे दंगल होते, ममता बॅनर्जींचा भाजपवर टीका

त्यानंतर तो खाली कोसळला. त्याच वेळी डॉ. भागवत कराड यांनी कार्यक्रम थांबवून त्या कॅमेरामनवर प्राथमिक उपचार करीत त्यास शुद्धीवर आणत त्यास धीर दिला व त्याची विचारपूस केली. त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्याची सूचनाही त्यांनी केल्या. अशाच प्रकारे मागच्या वेळीही विमान प्रवास करत असताना एका प्रवाशाचा जीव डॉ.भागवत कराड यांनी प्राथमिक उपचार करुन वाचवला होता.

हेही वाचा: 'अग्निपथ योजने'त युवकांना कुठला जाॅब...,रोहित पवारांचा मोदी सरकारला सवाल

त्यानंतर आज पुन्हा एका व्यक्तीचा जीव वाचवून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेल्या कराड यांनी डॉक्टरांची भूमिका बजावली.

Web Title: Union Minister For State Bhagwat Karad Save Cameraman Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bjpdelhidr bhagwat karad
go to top