कोरोना काळात गडकरींना फायदा, Youtube कडून मिळत असलेल्या कमाईचा सांगितला आकडा

नितीन गडकरी
नितीन गडकरीe sakal
Updated on

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांनी देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांमधील कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या (video conferencing) माध्यमातून संवाद साधला. यावेळी गडकरींनी त्यांच्या आयुष्यात कोरोनामुळे झालेल्या बदलांचा आवर्जून उल्लेख केला. आधी मी सोशल मीडियावर जास्त अ‌ॅक्टीव्ह नव्हतो. पंतप्रधान मोदी (PM modi) सतत सांगायचे की सोशल मीडियावर (social media) अॅक्टीव्ह राहा. मात्र, ते जमायचं नाही. आता कोरोना आला आणि या संधीचे मी सोन्यात रुपांतर केले. आता मला यूट्यूबकडून (Youtube) माझ्या भाषणांसाठी पैसे मिळतात, असे सांगतानाच स्वतःच्या यूट्यूब चॅनेलसाठी यूट्यूकडून महिन्याला किती पैसे मिळतात? याबाबत गडकरींनी माहिती दिली. (union minister nitin gadkari earn money from youtube)

नितीन गडकरी
'सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन करती हैं', अमृता फडणवीसांवर रुपाली चाकणकरांचा पलटवार

कोरोना हे संपूर्ण जगावर आलेले संकट आहे. त्यावर विजय मिळविणे गरजेचे आहे. माझ्या जीवनामध्ये कोरोनामुळे दोन - तीन महत्वाचे बदल झाले आहेत. या काळात सकाळी सायंकाळी उठल्यानंतर २५ मिनिटे चालायची सवय मला लागली आहे. मी आधी संगीत वगैरे ऐकत होतो. मात्र, कोरोना काळात मला भगवतगीताही ऐकायची सवय लागली आहे. या काळात लोकांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नव्हते. त्यामुळे मी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झालो. याच काळात ९५० व्हिडिओ कॉन्फरंन्स घेतल्या. त्याद्वारे माझे १ कोरड २० लाख ट्विटर फॉलोअर्स नव्याने जोडले गेले. सोबतच त्यांना यूट्यूकडून महिन्याला चार लाख रुपये कमाई सुरू झाली असल्याचे गडकरींनी सांगितले

कोरोना काळातील अनुभवासंदर्भात एक पुस्तक लिहिलं असल्याचंही गडकरींनी सांगितलं. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या १० हजार इंग्रजीमधील प्रती प्रकाशिकत होण्यापूर्वीच विकल्या गेल्यात. यामध्ये कोरोनामुळे सोशल मीडिया आणि आयुष्यात झालेले बदल याबाबत उल्लेख असल्याचेही गडकरींनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com