'सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन करती हैं', अमृता फडणवीसांवर रुपाली चाकणकरांचा पलटवार

Rupali Chakankar
Rupali Chakankaresakal

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (former cm devendra fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (amrita fadnavis) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (ncp leader rupali chakankar) यांच्यामध्ये ट्विटर वार रंगलाय. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत चक्रीवादळ आणि मुंबईत होत असलेल्या पावसावरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. आता आणखी अमृता फडणवीस यांनी 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती !' असे ट्विट केले आहे. त्याला रुपाली चाकणकर यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. जंगलातील शेरनी ही शिकार करत असून सर्कसमधील शेरनी ही फक्त मनोरंजन करत असल्याचा टोला चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. (ncp leader rupali chakankar criticized amrita fadnavis)

Rupali Chakankar
अमृता फडणवीसांच्या शायरीला रुपाली चाकणकरांचं 'तुफाँ तो इस शहर ने अक्सर झेला है'नं उत्तर

सध्या सोशल मीडियावर अनेकजण या वादळाची खिल्ली उडवताना दिसत आहेत, तर काहीजण फेसबुक, ट्विटर, व्हाॅटसअॅप व इतर माध्यमांव्दारे संदेशपर आवाहन करताहेत. यातच आता सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पावसाळी कवी बनून हलके-फुलके विनोद, चारोळी, फोटो, व्हिडिओ आणि मीम्स बनवून सोशल मीडियावर हास्याचं वादळ उठवलंय. या सोशल वादळात राजकीय पुढारी देखील मागे नाहीत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी 'तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है!' अशी शायरी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढेले होते. त्यानंतर या सोशल 'वादळात' राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी यांनी उडी घेतली. त्यांनी या 'शहरानं अनेक वादळं सहन केली असून महाराष्ट्रानं सहजरित्या ही वादळं परतवून लावली. तसेच यासोबत याच महाराष्ट्रानं हिंदूस्थानला देखील सांभाळलं', असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी जोरदार पलटवार केला.

आज अमृता फडणवीस यांनी 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती !' असे ट्विट करत रुपाली चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मात्र, गप्प बसतील त्या रुपाली चाकणकर नाहीच. त्यांनीही अमृता यांच्या शायरीला आपल्या शायरीनेच जोरदार प्रत्युत्तर दिले. 'जंगल की शेरनी शिकार करती है...सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन !' असे म्हणत अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे सर्कसची शेरनी म्हटले. या त्यांच्या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून चक्रीवादळात हे ट्विटचं वादळ चांगलचं थैमान माजवतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com