लखमापूर (ता. दिंडोरी) - ‘महाराष्ट्र हा सामाजिक ऐक्य जपणारा प्रदेश आहे; मात्र आजच्या परिस्थितीकडे पाहिले तर सामाजिक सौहार्दाची वीण तुटत आहे. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत असताना एकोप्याचे बंध मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,’असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.