Breaking : विद्यार्थ्यांनो, आता 'अशा' होणार परीक्षा; 'यूजीसी'ने जाहीर केली नियमावली!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

६ जुलैला केंद्रीय गृह मंत्रालयाने आणि युजीसीने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष लेखी परीक्षा किंवा ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीने सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा विद्यापीठांना घ्यावी लागणार आहे.

पुणे : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावर ठाम भूमिका घेतली असली तरी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठीची कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे. संसर्ग टाळण्यासाठी तापमान मोजणे, सॅनिटायझर, मुखपट्टीचा (मास्क) वापर आदी सूचना दिलेल्या  आहेत.

CISCE result 2020: आयसीएसई आणि आयएससीचे निकाल जाहीर; वाचा सविस्तर!​

राज्य सरकारने व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऐच्छिक केल्या. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांना सरासरी गुणांवर पदवी प्रमाणपत्र दिले जाणार होते. मात्र, ६ जुलैला केंद्रीय गृह मंत्रालयाने आणि युजीसीने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष लेखी परीक्षा किंवा ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीने सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा विद्यापीठांना घ्यावी लागणार आहे. यासाठी 'यूजीसी'ने परीक्षा कशी घ्यावी याबाबत निर्देश दिले आहेत. ते यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : तावडे आणि भावे यांचा पुन्हा जामिनासाठी अर्ज!

महाविद्यालय/विद्यापीठांना हे करावे लागणार :
- परीक्षा केंद्रातील भिंती, दरवाजे, प्रवेशद्वारे, खुर्चा निर्जंतुक करणे.
- परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवावे. 
- परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे आणि मास्क द्यावा.
- प्राध्यापक-कर्मचाऱ्यांकडून त्यांना कोणताही त्रास होत नसल्याचे हमीपत्र घ्यावे. 
- परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांचे तापमान तपासावे. 
- सर्वांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य.
- विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रात सोडताना गर्दी टाळावी. 
- प्रवेशद्वारावर दोन मीटर अंतर राखणारे चौकोन आखावेत.
- वापरलेले मास्क, ग्लोज यांची काळजीपूर्वक विल्हेवाट लावावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोघांमध्ये एक बेंच रिकामे
परीक्षा देताना विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर असावे, यासाठी दोघांमध्ये एक बेंच रिकामा असावा. विद्यार्थांचे प्रवेशपत्र, कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र परीक्षा केंद्रावर पास म्हणून ग्राह्य धरावे. ताप, खोकला असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी किंवा पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University Grants Commission has announced the guidelines for conducting the final year examinations