डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : तावडे आणि भावे यांचा पुन्हा जामिनासाठी अर्ज!

Dr_Narendra_Dabholkar
Dr_Narendra_Dabholkar

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी पुन्हा जामीनासाठी येथील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने यापूर्वीच त्या दोघांचेही अर्ज फेटाळून लावले आहेत.

सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे, असा दाबा सीबीआयकडून करण्यात आला आहे. तर दाभोलकर यांचा हत्यारा शरद कळसकर याला ऍड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाले आहे.

कळसकर याने पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणातील तपासात दिलेल्या कबुली जबाबावरून ऍड. पुनाळेकर आणि भावे यांना मे 2019 मध्ये महिन्यात अटक करण्यात आली होती. ऍड. पुनाळेकर यांना जामीन देण्यात आला आहे, तर भावे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. 3 सप्टेंबर 2016 डॉ. वीरेंद्रसिंग तावडे व त्यानंतर 19 फेब्रुवारी 2019 रोजी कळसकर व अंदुरे यांच्याविरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
ऍड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींना पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज करण्याची करण्याचा अधिकार असून त्यानुसार गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

जामीन अर्जावर सोमवारी (ता.13) सीबीआय आपले म्हणणे सादर करणार आहे. त्यानुसार पुढील सुनावणी होईल, अशी माहिती डॉ. तावडे आणि भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली. दरम्यान ऍड. पुनाळेकर यांनी या गुन्ह्यातून वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. जामीन अर्जासह भावे याने देखील या गुन्ह्यातून वगळण्यासाठी अर्ज केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनाक्रम : 
- दोघांचे जमीन अर्ज यापूर्वी फेटाळले
- पुरवणी दोषारोपपत्र सादर झाल्याने पुन्हा अर्ज
- सोमवारी (ता.13) सीबीआय म्हणणे सादर करणार
- डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या गुन्ह्यातील मास्टरमाइंड असल्याचा सीबीआयचा दावा
- भावे याचा जामीनसह गुन्ह्यातून वगळण्याचा अर्ज

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com