विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ उच्च महाविद्यालये असून त्याअंतर्गत ७० हजार विद्यार्थी प्रवेशीत आहेत. या विद्यार्थ्यांची २ एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार असून दररोज तीन सत्रात ही परीक्षा होईल. पारंपारिक अभ्यासक्रमांची परीक्षा पहिल्यांदा सुरू होणार आहे.
Maharashtra Zilla Parishad Head Master exam 2026

univercity exam 2026

sakal 

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. आता ज्या महाविद्यालयातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असतील, त्याच ठिकाणी परीक्षा होणार आहे. विद्यापीठाने त्याअनुषंगाने संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्रे पाठवून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती मागविली आहे. कॅमेरे नसतील तर त्याची सोय करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ उच्च महाविद्यालये असून त्याअंतर्गत ७० हजार विद्यार्थी प्रवेशीत आहेत. या विद्यार्थ्यांची २ एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार असून दररोज तीन सत्रात ही परीक्षा होईल. पारंपारिक अभ्यासक्रमांची परीक्षा पहिल्यांदा सुरू होणार असून १६ एप्रिलपासून लॉ आणि ३० एप्रिलपासून अभियांत्रिकीची परीक्षा सुरू होणार आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण वर्गांमध्ये नाहीत.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आता प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बंधन घातले आहे. कॅमेरे नसतील तर त्या महाविद्यालयात परीक्षा केंद्र नसणार आहे. लॉ कॉलेजमध्येच परीक्षा होणार असल्याने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यकच असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात विद्यापीठाकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यावेळी संलग्नित किती महाविद्यालयांनी विद्यापीठाचा आदेश पाळला समजणार आहे.

सीसीटीव्ही बंधनकारक, आता पुढील आठवड्याता आढावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी आम्ही प्रत्येक केंद्रावरील वर्गात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी, असा पत्रव्यवहार महाविद्यालयांशी केला आहे. पुढील आठवड्यात त्याचा आढावा घेतला जाईल. सीसीटीव्ही असलेली महाविद्यालयेच परीक्षा केंद्रे असतील, अशा सूचनाही सर्वांना दिल्या आहेत.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

१६ एप्रिलपासून ‘लॉ’ विद्यार्थ्यांची परीक्षा

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात दोन, सोलापूर शहरात दोन आणि बार्शीत एक, अशी पाच ‘लॉ’ महाविद्यालये आहेत. दरवर्षी या विद्यार्थ्यांची परीक्षा वेगवेगळ्या महाविद्यालयातील केंद्रांवर होत होती. पण, आता त्याच लॉ महाविद्यालयात परीक्षा होणार आहे, पण त्या कॉलेजमधील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. १६ एप्रिलपासून लॉ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com