Omicron : अनलॉक, शाळांचं काय होणार? आरोग्य मंत्र्यांनी केलं स्पष्ट

ओमिक्रॉनबाबतची इंत्यभूत माहिती अद्याप WHOजवळ उपलब्ध नाही.
rajesh tope
rajesh topesakal

मुंबई : ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात करण्यात आलेलं अनलॉक आणि शाळा सुरु करण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्याकडे या नव्या व्हेरियंटबाबत अद्याप काही नाहीच त्यामुळे उगीचच चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळं राज्यात सध्या अनलॉक झालेलं आहे ते कायम राहिलं आणि शाळा १ डिसेंबरपासूनच सुरु होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.

rajesh tope
ओमिक्रॉन विषाणूचे फोटो पहिल्यांदा आले समोर; इटलीत होतंय संशोधन

टोपे म्हणाले, राज्यात सध्या अनलॉक झालेलं आहे ते अनलॉकच राहिलं. शाळा १ डिसेंबरपासूनच सुरु होतील. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं बोलणं झालेलं असून आम्ही त्यांना ना हरकत दिलेली आहे. लहान मुलांसाठी जे टास्क फोर्स तयार केलेलं आहे. त्यांनी देखील शाळा सुरु करण्याला संमती दिलेली आहे. त्यामुळं आज सुरु असलेल्या गोष्टी बंद होणार नाहीत. आपल्याकडे काही नाहीच त्यामुळे उगीचच चिंता करण्याचं कारण नाही. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनबाबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली.

केंद्राची अॅडव्हायझरी राज्यात लवकरच लागू होणार

राज्यात परदेशातून दाखल होणाऱ्या प्रवाशांबाबत मुख्यमंत्र्यांचं असं मत आहे की, साउथ अफ्रिकेतून मुंबई, पुण्यासह राज्यात इतर ठिकाणी जी विमानं लँड होतात, ती आता थांबवायला हवीत. केंद्राकडेयाबाबत आपण विनंती केली आहे. केंद्रानं जरी आपल्याला परवानगी दिली नाही तरी आपण हे थांबवावं असा विचार त्यांनी मांडला. केंद्राच्या आरोग्य विभागानं २८ नोव्हेंबरला अॅडव्हायझरी जाहीर केली आहे. यामध्ये म्हटलंय की, धोकादायक देशांची यादी तयार करण्यात आली असून या देशांमधून आलेले जे प्रवाशी आहेत. जे देशात कुठेही उतरले तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक आहे. तसेच सात दिवसांचं क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आलं आहे. यानंतर पुन्हा आरटीपीसीआर केल्यानंतरच त्यांना मुक्त करण्यात येणार आहे. हा नियम तातडीनं महाराष्ट्रातही लागू करण्यात येईल, असंही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

ओमिक्रॉनची माहिती अद्याप WHO कडेही नाही - टोपे

ओमिक्रॉनबाबतची इंत्यभूत माहिती अद्याप WHOजवळ उपलब्ध नाही. पण हा व्हेरियंट फार झपाट्यानं संसर्ग होणारा व्हेरियंट असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण साउथ अफ्रिकेत पंधरा दिवसात डेल्टाला रिप्लेस करण्याचं काम या ओमिक्रॉन व्हेरियंटनं केलं आहे. पण तो खरोकरच धोकादायक आहे का? रुग्णाला आयसीयूत दाखल करावं लागू शकेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? याबाबत अद्याप कुठेही अभ्यास झालेला नाही किंवा त्याचे जे इतर ज्या शक्यता आहेत जसे आपण जी लस घेतली आहे आहे, त्या लसीपासून तो स्वतःचा बचाव करु शकतो का? याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही.

धोकादायक असल्याचं अद्याप उदाहरण नाही

एक सुदैवाची गोष्ट म्हणजे आपली आरटीपीसीआर टेस्ट हा ओमिक्रॉनला शोधू शकते. कारण मनुष्याच्या शरीरात तीन प्रकारच्या जीन असतात त्यांपैकी एस जीन जर दिसत नसेल तर तो व्हेरियंट म्हणजे ओमिक्रॉन असं मानलं जातं. त्यामुळे आता याबाबतचं जिनोमिंग सिक्वेसिंगचं जे काम असतं याद्वारे आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. पण चिंता करण्याचं कारण नाही. कारण आज आपल्या देशात आणि राज्यात कुठेही ओमिक्रॉन आढळेलेला नाही. तसेच फोर धोकादायक असल्याचं उदाहरण अद्याप दक्षिण अफ्रिकेतूनही आलेलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com