

Unseasonal Rain Not Due to Chemical Trials
Esakal
पुणे, ता. २० गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत होणारी मेघगर्जना आणि अवकाळी पावसाबाबत सोशल मीडियावर 'केमिकल ट्रायल' (कृत्रिम प्रयोग) सारख्या विविध अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून, हा पाऊस पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रीय कारणांमुळे होत असल्याचे स्पष्टीकरण हवामानतज्ज्ञांनी दिले आहे. नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.