

Weather forecast affecting farmers Maharashtra
esakal
Weather Alert For Farmers : महाराष्ट्रात अचानक वातावरणात बदल झाल्याने थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाचे सावट राज्यावर असले तरी हवामान अंदाजानुसार पाऊस होणार नाही परंतु राज्यात ढगाळ वातावरण काही दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान आहे. याचा परिणाम थंडीवर झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमानात आज चांगलीच वाढ झाली होती.