Ajit Pawar: राज्यात अवकाळी पावसाचा फटका; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे.
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. पुढील दहा दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

Ajit Pawar
Weather Update : आजही राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज?

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ऐन हिवाळ्यात राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात गारांसह पाऊस झाल्यामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्ही मराठीने दिले आहे.

Ajit Pawar
Lalit Patil Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट! ससूनमधील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com