कोरोना काळात कुणी काय केलं, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल | Chandrakant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

कोरोना काळात कुणी काय केलं, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संसदेत म्हटल्याप्रमाणे देशाचे तुकडे पाहण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरुच आहे. महाराष्ट्र काँग्रेसला ही पंरपरा पुढे नेण्याचा आदेश हायमांडकडून मिळालाय का? कोरोनाकाळात कुणी काय केलं, याचे हिशोब महाराष्ट्रात अचानक कुणाच्या आदेशावरुन सुरु झाले आहेत?, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरल्याची टोला त्यांनी सोमवारी लगावला होता.(Chandrakant Patil Attack On Mahavikas Aghadi Over Corona Situation Handling)

हेही वाचा: अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध, पदाधिकाऱ्यांना अटक

पुढे पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कोरोनाकाळात केंद्रानं राज्यांना दिलेली व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीर, PPE किट वगैरेही मविआला गरजूंना धड देता आली नाहीत. आमचं दिल्लीतलं वजन वापरून मदत आणावी, अशा निर्लज्ज मागण्या तुम्ही केल्या. केंद्र काहीच देत नव्हतं? केंद्रानं जे दिलं, याचा लसीकरण हा बोलका पुरावा आहे. मुळात राज्यात कोरोनाशी लढाई सुरू असताना मविआ (Mahavikas Aghadi) कुठे होतं? पत्रकार परिषदा आणि फेसबुक लाइव्हपुरतं काही नेत्यांचं अस्तित्व होतं. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंसह ट्विटरबाज होते कुठे? केंद्राची मदत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं फील्डवर्क, अशी राज्याची कोरोनाशी लढाई होती, असे पाटील म्हणाले.

Web Title: Untitled Feb 08 2022 1250

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..