esakal | "हवं तर हेलिकॉप्टर वापरा, पण सगळ्यांना सुखरूप बाहेर काढा"
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

"हवं तर हेलिकॉप्टर वापरा, पण सगळ्यांना सुखरूप बाहेर काढा"

sakal_logo
By
विराज भागवत

कोकण, ठाणे, पालघरमधील पूरपरिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी घेतली महत्त्वाची बैठक

मुंबई: गेल्या दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall in Mumbai) ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती (Flood) उद्भवली असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. ठाणे आणि पालघर जिल्हाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून तात्काळ लागेल ती सर्व मदत पोहचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. भिवंडी, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कर्जत, कसारा, खोपोली येथील पूरपरिस्थितीचीदेखील (Flood Conditions) माहिती ठाकरे यांनी घेतली. पूरात अडकेलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लागेल ती सर्व मदत करा आणि आवश्यकता भासल्यास हेलिकॉप्टरचीही मदत घ्या, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. (Use Helicopters to save people if required orders CM Uddhav Thackeray)

हेही वाचा: लस घेतलेल्यांना लोकल सेवा सुरु करा; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईसह ठाणे, वसई विरार, पालघर, कल्याण सर्वच भागात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. पूर्व-पश्चिममधील काही भागात रस्ते वाहतूक ठप्प झाली. बुधवार रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी आणि उल्हास नदीच्या बाजूला असलेल्या परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याणमध्ये काही भागात विद्युत पुरवठा खंडित आहे. पावसाचे पाणी वाढले असून विविध परिसरमध्ये असलेल्या सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

loading image