
महाराष्ट्रातल्या मदरशांतही राष्ट्रगीत अनिवार्य करा; भाजपाची मागणी
उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) नुकतंच मदरशांमध्ये राष्ट्रगीत (National Anthem) म्हणणं बंधनकारक केलं आहे. वर्ग सुरू होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना आता राष्ट्रगीत म्हणावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यांतल्या मदरशांमध्येही राष्ट्रगीत बंधनकारक करण्यात यावं अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. (BJP on Maharashtra Govt)
भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी ही मागणी केली आहे. भोसले म्हणाले, "उत्तरप्रदेशातल्या सर्व मदरशांत राष्ट्रगीत बंधनकारक केलंय. धार्मिक शिक्षण, शारिरीक शिक्षणाबरोबर राष्ट्रभक्ती रुजणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही योगी सरकारच्या (Yogi Government) निर्णयाचं स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करतो. तसंच महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की त्यांनीसुद्धा असाच निर्णय घ्यावा आणि राज्याच्या सर्व मदरशांत राष्ट्रगीत बंधनकारक करावं".
हेही वाचा: यूपीत मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; योगी सरकारचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेश सरकारने नुकताच मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रगीत म्हटलं जातंय की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. सकाळी वर्ग सुरू होण्यापूर्वी दुआ पठण केलं जातं. पण आता दुआ पठणासोबतच राष्ट्रगीत म्हणणंही बंधनकारक असणार आहे.
Web Title: Uttar Pradesh Madarsa National Anthem Compulsory Bjp Demands In Maharashtra Too
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..