esakal | गोव्यात शिवसेनेचा महाविकास आघाडीचा प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

गोव्यात शिवसेनेचा महाविकास आघाडीचा प्रयोग

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : उत्तर प्रदेशात (uttar pradesh) शिवसेना (shivsena) 80 ते 90 जागा लढणार आहे. तर, गोव्यात (Goa election) 20 जागा लढवणार आहे. गोवा विधानसभेसाठी महाविकास आघाडी (mva government) सारखा प्रयोग करण्यात येईल. तर, उत्तर भारतात (north India) शेतकरी संघटनाच्या (Farmers union) पाठिंब्याने निवडणूक लढणार आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 354 नव्या रुग्णांची भर; 7 जणांचा मृत्यू

आगामी काही महिन्यात देशातील महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे.यात उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुक लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.उत्तर प्रदेशातील 80 ते 90 जागा लढण्याचा विचार सुरु आहे.उत्तर प्रदेशातील काही शेतकरी संघटनांचा शिवसेनेला पाठींबा आहे.तर,काही लहान पक्षांनाही पाठींबा द्यायचा आहे.असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी नमुद केले.उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व जागा शिवसेना लढणार अशी चर्चा सुरु होती.मात्र,सर्व जागा लढण्याचा विचार नसल्याचे सांगण्यात आले.

गोवा राज्यात शिवसेना महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याच्या विचारत आहे.त्यात कितपत यश येत हे आतच निश्‍चित सांगता येणार नाही.पण,त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत.त्या महाविकास आघाडीत शिवसेनेला चांगले स्थान मिळाल तर नक्‍कीच शिवसेना त्यांच्यामध्ये सहभागी होईल असेही राऊत यांनी नमुद केले.

loading image
go to top