UP News: मदरशांमध्ये नेमकं काय शिकवलं जातंय; उत्तर प्रदेशमध्ये होणार सर्व्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP News

UP News: मदरशांमध्ये नेमकं काय शिकवलं जातंय; उत्तर प्रदेशमध्ये होणार सर्व्हे

लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना कोणते विषय शिकवले जातात, कोणत्या विषयाची किती पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालीत, याचा सर्व्हे होणार आहे. तसे आदेश पाठ्यपुस्तक अधिकारी डॉ. पवर कुमार यांनी जिल्ह्यांना दिले आहेत.

राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री धर्मपाल सिंह यांनी मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या पुस्तकांचं स्वरुप बदलण्याचे निर्देश दिले होते. विद्यार्थ्यांना एनसीईआरटीच्या पुस्तकांसाठी पालकांच्या खात्यात थेट पैसे देण्याचे आदेश होते. मात्र ही योजना खितपत पडली आहे.

अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ अनुभागचे विशेष सचिव आनंद कुमार सिंह यांनी अल्पसंख्याक कल्याण विभागाला पत्र पाठवलं. यात त्यांनी सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील ५५८ अनुदानीत मदरशांमध्ये मोफत पाठ्यपुस्तक दिली जात असल्याचं सांगितलं. त्यामुळे पालकांच्या खात्यात टाकलेल्या पैशांचा दुरुपयोग होऊ शकतो, त्यामुळे या योजनेचा पुनर्रविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

विशेष सचिवांनी अनुदानित मदरशांमध्ये चालू आर्थिक वर्षांमध्ये कोणत्या विषयांची किती पुस्तके कुठल्या भाषेत उपलब्ध करुन दिली, या माहितीची मागणी केली होती. त्यामुळे चालू आठवड्यात मदरशांमध्ये कुठले विषय शिकवले जातात, कोणती पुस्तके विद्यार्थ्यांकडे आहेत, याचा सर्व्हे होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradeshmuslim