फक्त लसीकरणच नाही, तर आणखी एका गोष्टीमुळे महाराष्ट्रात कोरोनाची साथ नियंत्रणात | covid-19 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Test

फक्त लसीकरण नाही, तर 'या' गोष्टीमुळेही महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मंगळवारी ७६६ कोविड रुग्णांची नोंद झाली आणि १९ रुग्णांचा कोविडमुळे (Covid-19) मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६,६३१,२९७ कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. १ लाख ४० हजार ७६६ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत १९० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आणि एकाचा मृत्यू झाला. कोविडमुळे मुंबईत एकूण १६,३११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात संपूर्ण महाराष्ट्रात ८७,५०६ कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मंगळवारी ९२९ रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात रोजचा कोविड पॉझिटिव्हिटीचा दर ०.८७ टक्के आहे. याआधी पुण्यामध्ये सर्वाधिक कोविड रुग्णांची नोंद होत होती. त्याखालोखाल ठाण्यात रुग्णवाढ सुरु होती. सध्या ९,४९३ सक्रिय कोविड रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक २,५६१ रुग्ण आहेत, त्यापाठोपाठ पुणे (२,०२७) आणि ठाण्यात (१,१६०) रुग्ण आहेत.

हेही वाचा: '3 पक्षाचे 3 मंत्री सकाळी येऊन सरकार खंबीर असल्याचं चेक करतात'

"सक्रीय रुग्णांची कमी असलेली संख्या हे कोविडचा संसर्ग कमी झाल्याचे लक्षण आहे. व्हायरसला रोखण्यासाठी केलेल्या वेगवेळ्या उपायोजनांचे परिणाम आता दिसत आहेत" असे राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले. कोविडची दुसरी लाट जोरात असताना २३ एप्रिलला राज्यात ६ लाख ९१ हजार ८५१ कोविड रुग्णांची नोंद झाली होती. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी

१३ ऑक्टोबरला ३० हजारपेक्षा कमी आणि २७ ऑक्टोबरला २० हजारपेक्षा कमी कोविड रुग्णांची नोंद झाली. कोरोनाविरोधात लसीकरण आणि हर्ड इम्युनिटी म्हणजेच सामूहिक प्रतिकारशक्ती यामुळे कोविड रुग्णसंख्येत घट झाल्याचे डॉ. अमीत मंदोत यांनी सांगितले

"करोना रुग्ण संख्या कमी करण्यामध्ये लसीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे कोविडची बाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाणही घटले. त्याचबरोबर लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत आहे. यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला" असे डॉ. मंदोत म्हणाले.

loading image
go to top