
वैष्णवी मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सात दिवस फरार होते. या काळात ते पुणे, सातऱ्यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात फिरले. तेव्हा त्यांना मदत केलेल्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मुक्काम केला होता. यासाठी कर्नाटकातील माजी मंत्र्याच्या मुलाने त्यांना मदत केली होती.