
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकणात पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केलीय. आतापर्यंत एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला वैष्णवीचा पती, सासू, नणंद यांना अटक केली होती. वैष्णवीच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांना फरारकाळात मदत करणाऱ्यांनाही अटक केली आहे. यात एका माजी मंत्र्याच्या मुलाचा समावेश आहे.