मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. शनिवारी रात्री त्याची प्रकृती अचानक बिघडली. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास जाणवायला लागल्यानं वैद्यकीय पथक तुरुंगात बोलावण्यात आलं. त्याची तुरुंगातच तपासणी करण्यात आली. पण रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचं वैद्यकीय पथकाने सांगितलं.