

Mahad Varadvinayak Temple Darshan Closed
ESakal
खालापूर : अष्टविनायक तीर्थक्षेत्र महड येथील श्री वरदविनायक मंदिराच्या पुनर्विकासाच्या (जीर्णोद्धार) कामाचे उद्घाटन झाले आहे. यादरम्यान मूळ मंदिराचा गाभारा वगळता सर्व बांधकाम जमीनदोस्त होणार आहे. त्यामुळे तीन महिने मंदिर दर्शनासाठी भाविकांना पूर्णपणे बंद राहणार आहे.