esakal | राज्यात एकाच दिवसात 14 लाखांपेक्षा अधिक लस मात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राज्यात एकाच दिवसात 14 लाखांपेक्षा अधिक लस मात्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने (Maharashtra) लसीकरण (Vaccination) मोहिमेला गती दिली असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) मोहिमेत आज, बुधवारी 14 लाख 39 हजार 809 नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 6 कोटी 55 लाखांवर गेली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर परिश्रम घेऊन लसीकरणाचे नवे विक्रम करत आहे.21 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 11 लाख 4 हजार 465, तर 4 सप्टेंबर रोजी 12 लाख 27 हजार 224 नागरिकांचे लसीकरण झाले त्यानंतर 12 लाख लसीकरणाचा विक्रम मोडून काढत आज सुमारे 14 लाख 39 हजार 809 लसींची मात्रा एका दिवसात देण्याची किमया आरोग्य विभागाच्या यंत्रणेने करून दाखवली आहे. लसीकरण कार्यक्रमातील हे आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक यासाठी परिश्रम घेत आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

हेही वाचा: ...तर आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही

लसीची दुसरी मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 6 कोटी 55 लाख 20 हजार 560 लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख 78 हजार 805 जणांना दुसऱ्या लसीची मात्रा देऊन त्यांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लसीकरण मोहिमेला राज्यात गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सध्या धोका नाही: राजेश टोपे

लसीकरणावर एक दृष्टिक्षेप

-18 पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : 48.46%

-18 ते 44 वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : 37.88%

-45 पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : 52.24%

दैनंदिन लसीकरण

-21 ऑगस्ट - 11,04,465

-30 ऑगस्ट - 10,35,413

-1 सप्टेंबर - 9,79,540

-4 सप्टेंबर - 12,27,224

loading image
go to top