Vasant More slams BJP MP Nishikant Dubey for threatening Raj and Uddhav Thackeray : गरीब हिंदी भाषिकांना काय मारता? उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडुत यात . तुम्हाला उचलून आपटू असं आव्हान भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. त्यानंतर आता यावरून मोठं राजकारण तापलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही आता निशिकांत दुबे यांचा समाचार घेतला आहे. शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या असं थेट आव्हान त्यांनी खासदार दुबे यांना दिलं आहे.