श्रीनाथ वानखडे
Festivals and Cultural Significance of Vasant Ritu : फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. मानवाला उष्णता असह्य होत असताना उष्ण रक्ताच्या पक्ष्यांना हा काळ थोडा सुखावणारा असतो. वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गात एकीकडे पानझड होत असताना दुसरीकडे पळस, पांगरा, शाल्मली सारखे गर्द रंगाचे फुलांची उधळण होत आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात ह्याच फुलांचा मकरंद पक्ष्यांसाठी 'ज्यूस बार' म्हणून मेजवानी ठरत आहे.