वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार जाहीर

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार जाहीर

क्रांतिअग्रणी, अंबालिका आणि दौंड शुगर कारखाना सर्वोत्कृष्ट
पुणे - राज्यातील २०१९-२०च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांसह ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’कडून (व्हीएसआय) देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यंदाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार नगर जिल्ह्यातील अंबालिका शुगर कारखान्याला आणि सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर कारखान्याला प्राप्त झाला. 

प्रत्येकी एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता मांजरी बुद्रूक येथे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइन उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री आणि विश्वस्त कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. पारितोषिक वितरण समारंभ स्वतंत्ररीत्या नंतर होईल, अशी माहिती संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विभागवार ऊस भूषण पुरस्कार -

  • दक्षिण विभाग : अण्णासाहेब धनपाल खुरपे, माजरेवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. 
  • चंद्रकांत हनुमंत यादव, सासपडे, जि. सातारा आणि अशोक वसंत जाधव, टेंभू, ता. कराड, जि. सातारा.
  • मध्य विभाग : जयसिंग दाजी भूसनर, शिरढोण, ता. पंढरपूर, जि. सोलापूर आणि वसंत दामू गराडे, धामणे, ता. मावळ, जि.पुणे.

वैयक्तिक पुरस्कार -

  • उत्कृष्ट ऊस विकास अधिकारी : सर्जेराव वाडे, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना, अंबड, जि. जालना.
  • उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी : सागर बंडोपंत पाटील, क्रांती अग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड, कुंडल ता. पलूस जि. सांगली. 
  • उत्कृष्ट चीफ इंजिनिअर : विजय महादेव खालकर, कादवा साखर कारखाना राजारामनगर, ता. दिंडोरी, जि. नाशिक. 
  • उत्कृष्ट चीफ केमिस्ट : शशिकांत विश्‍वनाथ गिरमकर, दौंड शुगर आलेगाव, जि. पुणे. 
  • उत्कृष्ट कार्यकारी संचालक : यशवंत शंकर कुलकर्णी, पांडुरंग साखर कारखाना माळशिरस, जि. सोलापूर.

संस्थेमधील उत्कृष्ट कर्मचारी -

  • शिवाजी खेंगरे, चीफ अकाउंटंट
  • विश्वास घुले, पर्चेस ऑफिसर
  • सचिन साबळे, शास्त्रज्ञ 
  • डॉ. प्रीती देशमुख, शास्त्रज्ञ 
  • रूपेश धुमाळ, वाहनचालक.

विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार (दक्षिण विभाग) -

  • प्रथम पारितोषिक : दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्री, ता. कागल, जि. कोल्हापूर.
  • द्वितीय पुरस्कार : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना असलज, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर. 
  • तृतीय पुरस्कार : यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना, रेठरे, ता. कराड, जि. सातारा.

उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार -

  • दक्षिण विभाग : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, ता. कागल जि. कोल्हापूर 
  • मध्य विभाग : भीमाशंकर साखर कारखाना, पारगाव ता. आंबेगाव, जि.पुणे. 
  • उत्तर-पूर्व विभाग :  पूर्णा साखर कारखानृा ता. वसमत, जि. हिंगोली. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com