Lampi Disease : राज्यभरात 2664 जनावरांना लम्पीची लागण; आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना

Lampi Disease
Lampi DiseaseSakal

मुंबई : राज्यात सध्या लम्पी या आजाराने थैमान घातलं असून राज्यात आजपर्यंत २६६४ जनावरे संक्रमित झाले आहेत. राज्यातील ३३८ गावांमध्ये हे रुग्ण आढळले असून आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण झाले असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. सध्या लम्पी या आजारावरील १६ लाखाहून अधिक लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचबरोबर अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

(Lampi Disease Maharashtra State Latest Updates)

महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये देखील लम्पी या रोगाचे काही रुग्ण आढळले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जणावरांना याची लागण झाली होती. त्यामधील फक्त १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता अशी माहिती त्यांनी दिली. लम्पी चर्म रोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही. त्याचबरोबर म्हशीला हा रोग होत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गाय आणि बैलाला होतो. त्यामुळे सध्या राज्यात पुढील आदेश येईपर्यंत बैल बाजार बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेले नियम पाळण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.

Lampi Disease
Love Jihad: मुस्लीम तरूणीशी लग्न केलेल्या श्रीरामपुरातील 'त्या' तरूणाचा खून

जनावर दगावल्यास मिळणार मदत

लम्पी रोगामुळे जनावर दगावल्यास त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार आहे. यासंदर्भात आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तरीही काळजी घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

काय आहेत लम्पी रोगाची लक्षणे?

  • प्राण्याची भूक कमी होणे

  • ताप येणे

  • अंगावर सूज येणे

जर तुमच्या प्राण्याला असे काही लक्षण दिसत असतील तर लवकरात लवकर पशूसंवर्धन विभागाशी संपर्क साधा. तसेच विभागाच्या आयुक्तालयातील डॉक्टरांशी सकाळी ८ ते ६ या वेळेत टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

Lampi Disease
Chandrakant Khaire: मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता; पैसे देऊन गर्दी जमवली

कुठल्या जिल्ह्यात लम्पीचे किती रुग्ण

  • जळगाव: ५१२

  • अहमदनगर: २७७

  • धुळे: ७९

  • अकोला: ६३६

  • पुणे: २०३

  • लातूर: १०२

  • औरंगाबाद: ३२

  • बीड: २३

  • सातारा: ५५

  • बुलढाणा: २३३

  • अमरावती: ३७८

  • उस्मानाबाद: ९

  • कोल्हापूर: २५

  • सांगली: २३

  • यवतमाळ: ९

  • परभणी: २०

  • सोलापूर: १०

  • वाशीम: २०

  • नाशिक: १०

  • जालना: ७

  • पालघर:१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com