Vedanta & Foxconn: याविरोधात तरूण तरूणींनी पेटून उठलं पाहिजे; अजित पवारांचा एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vedanta & Foxconn: याविरोधात तरूण तरूणींनी पेटून उठलं पाहिजे; अजित पवारांचा एल्गार

Vedanta & Foxconn: याविरोधात तरूण तरूणींनी पेटून उठलं पाहिजे; अजित पवारांचा एल्गार

जळगाव : "वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील दीड ते दोन लाख रोजगार गेला आहे. त्यामुळे सरकारविरोधात तरूण तरूणींनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे. सरकारनेही जनतेला वेड्यात काढू नये, आम्हीही राजकारण केलं आहे. यापेक्षा दुसरा मोठा प्रकल्प राज्यात येणार असं लॉलीपॉप सरकारकडून दाखवलं जात आहे. दुसरा प्रकल्प तर आलाच पाहिजे पण हासुद्धा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला पाहिजे" असं वक्तव्य विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. जळगाव येथील सभेत ते बोलत होते.

(Ajit Pawar On Vedanta & Foxconn Project)

दरम्यान, येथील सभेत बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गप्प का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. "सध्या लम्पीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीकं वाहून गेले आहेत आणि हे सांगतात सर्वसामान्यांचं सरकार. कसलं आलंय सर्वसामान्यांचं सरकार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिलंय पण आत्तापर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. गाजर दाखवायचे धंदे या सरकारने बंद करावेत" अशा शब्दांत विरोधीपक्षनेत्याने सरकारला फटकारलं आहे.

हेही वाचा: Vedanta & Foxconn प्रकल्प गुजरातेत; महाराष्ट्राला काय होणार तोटा?

"शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे हे राज्य आहे. इथे गद्दारी चालणार नाही. राज्यात आत्तापर्यंत फक्त १८ मंत्र्यांचा शपथविधी झालाय. त्यामधील १२ मंत्र्यांनी चार्जच घेतला नाही. तर पुढच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी पितृपक्षाचे कारण दिलं जातंय." असं वक्तव्य करत दादा भुसे यांच्या मंत्रिपदावरून अजित पवारांनी टोला लावला आहे.

त्याचबरोबर, मुख्यमंत्री सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतात असं सांगितलं जातंय पण मग मुख्यमंत्री कधी उठतात? असा खोचक सवाल केला असून मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या कामावर आक्षेप घेत वेदांता आणि फॉक्सकॉनबाबत तरूणांनी आवाज उठवला पाहिजे असं विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.

Web Title: Vedanta Foxconn Project Gujrat Ajit Pawar Youth Protest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..