राज्यात वाहन करामध्ये सवलत मिळाल्यामुळे वाहतूकदारांमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

कोरोना लॉकडाउनच्या काळात एक एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान वाहन करात सवलत देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. त्याचा फायदा राज्यातील सुमारे १२ लाख व्यावसायिक वापराच्या वाहनमालकांना होणार आहे.

पुणे - वाहन करामध्ये सवलत मिळाल्यामुळे मालवाहतूकदार आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे जीवन आता काही प्रमाणात तरी सुसह्य होईल, अशी प्रतिक्रिया शहरातील मालवाहतूकदारांनी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना लॉकडाउनच्या काळात एक एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान वाहन करात सवलत देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. त्याचा फायदा राज्यातील सुमारे १२ लाख व्यावसायिक वापराच्या वाहनमालकांना होणार आहे.

कोरोना चाचण्यांमध्ये पुणे देशात अव्वल स्थानावर

या व्यावसायिकांना दर तीन महिन्यांनी वाहन कर भरावा लागत होता. आता त्यांना एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या वाहनकरात सवलत मिळाली आहे. याबाबत बस अँड कार कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे (बोकी) राष्ट्रीय अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन म्हणाले, ‘‘लॉकडाउनच्या काळातील वाहन कर माफ करावा, या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत होतो. हा कर ३१ डिसेंबरपर्यंत माफ व्हावा, अशी अपेक्षा होती. परंतु, सरकारने सहा महिन्यांचा माफ केला आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे.’’ 

हातात पैसा नाही, खायचं काय?; डीएसकेंच्या गुंतवणूकदारांचा प्रश्‍न

पुणे डिस्ट्रिक्‍ट लक्‍झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर म्हणाले, ‘‘सरकारने काही तरी आमचा विचार केला, ही समाधानाची बाब आहे. थोड्या प्रमाणात तरी आमचे जीवन आता सुसह्य होईल.’’ राज्य प्रवासी व माल वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनीही, करात सवलत मिळाल्यामुळे राज्य सरकारचे आभार मानले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicle tax transporters happy