औरंगाबादजवळ असलेलं वेरूळ हे ऐतिहासिक लेण्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेच शिवाय ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ गाव देखील आहे. येथे शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले राहत असतं. त्यांच्यासाठी इथे मोठी गढी बांधण्यात आली होती. ही गढी मालोजीराजे यांचे निवासस्थान होतं. या गढीचे अवशेष आजही याठिकाणी बघायला मिळतात.