
कर्जत : कुस्तिक्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आमदार रोहीत पवार मित्र मंडळ,जिल्हा तालीम संघ आणि कर्जत तालुका कुस्तीगीर संघाचे वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरचा वेताळ शेळके विजयी ठरला. गादी वर झालेल्या अंतिम सामन्यात १- ७ च्या फरकाने वेताळ शेळके यांनी मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटील याच्या एकहाती विजय मिळवित महाराष्ट्र केसरी किताब मानकरी ठरला.तर पृथ्वीराज पाटील उप महाराष्ट्र केसरी ठरला. विजेत्याला ज्येष्ट नेते शरदचंद्र पवार यांचे हस्ते चांदीची गदा आणि बुलेट गादी बक्षीस म्हणून देण्यात आली.