esakal | ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचं वय 94 होतं. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं आहे.

  • दत्ताराम मारुती मिरासदार हे मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार

  • शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले.

  • पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी

  • इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला.

  • पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

  • व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत.

  • कथाकथनाचे तीनहजारांहून अधिक कार्यक्रम केल्याने या त्रयीच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे.

  • कॅनडा-अमेरिकेतल्या २३ गावांतून २५ कार्यक्रम करायचा विक्रमही केला होता. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणेही गाजत असत.

loading image
go to top