esakal | राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील

बोलून बातमी शोधा

As the Vice Chancellor of Rahuri Agricultural University, Dr. Prashant Kumar Patil}

राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेले पाटील हे विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी आहेत. त्यांना हा सन्मान मिळाला

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील
sakal_logo
By
रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केन्द्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राज्यातील सर्वोत्तम तसेच दहा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. २७) डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता.  
डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खरगपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी प्राप्त केली आहे.   

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी डॉ. लक्ष्मण सिंह राठोड, माजी महासंचालक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंग व राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले हे सदर समितीचे सदस्य होते.

गेल्या काही वर्षांत खऱ्या अर्थाने विद्यापीठ गेल्या पाच वर्षांमध्ये पुढे जाण्याऐवजी मागे गेलेले दिसून आले. आता डॉ. पाटील यांच्या नियुक्ती नंतर अधिकारी, कर्मचारी व शास्त्रज्ञाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राहुरी कृषी विद्यापीठाच्या संशोधक संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, डॉ. विठ्ठल शिर्के यांनी मुलाखती दिलेल्या होत्या.