

Severe heatwave grips Vidarbha as Amravati records one of the highest temperatures in India, while IMD issues a yellow alert for possible thunderstorms and rain in parts of Maharashtra.
esakal
विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून, अमरावती येथे देशातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी (१४ मार्च) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत अमरावतीत ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जी देशातील उच्चांकी ठरली. यापूर्वी गुरुवारी (१३ मार्च) अमरावतीत ४२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते, जे देशातील सर्वाधिक होते. विदर्भात आज हलकी उष्णतेची लाट येण्याची तसेच काही भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.