Video : येवल्याच्या कारागीरानं शेल्यावर साकारली फडणवीसांची प्रतिमा

आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Devendra Fadnvis_Paithani
Devendra Fadnvis_Paithani

मुंबई : येवल्याच्या पैठणी साड्या जगप्रसिद्ध आहेत कारण तिथले कारागीर, विणकार हे अव्वल दर्जाचे आहेत. मयूर मेघराज या पैठणी कारागीरानं स्वतःच्या हातानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा एका शेल्यावर साकारली आहे. त्याच्या या कलाकृतीचं कौतुक करण्याचा मोह आमदार गोपीचंद पडळकरांनाही आवरला नाही. या पैठणी शेल्याचा खास व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. (Video image of Fadnavis was created on the shela by Yevla craftsman)

आपल्या या कलाकृतीबद्दल सांगताना मयूर म्हणाला, येवला हे शहर पैठणी साड्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे पाचशे वर्षांचा या साड्यांना इतिहास आहे. येवल्याच्या पैठणी या हातमागावर विणल्या जातात. अत्यंत सुंदर अशा कलाकृती इथल्या कारागिरांनी साड्यांवर साकारली आहे. त्यातूनच मला कल्पना सुचली की राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचं चित्र काढावं. त्यानुसार मी हे काम हाती घेतलं जे आता पूर्ण झालं आहे. यासाठी मला २० ते २५ दिवस लागले. या शेल्यावर विशेष प्रकारच्या गोल्डन जरीचा वापर केलेला आहे. तसेच रेशमाचा वापर केला आहे. यासाठी या शेल्यावर चारशे ते पाचशे रेशमाचे काकडे डिझाईनसाठी चालत होते. यासाठी मला १५ ते २० हजार रुपये खर्च लागला. देवेंद्र फडणवीसांना मी हा शेला भेट म्हणून देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com